थोडीशी माहिती

ग्रामपंचायत येवती, तालुका - श्रीगोंदा, जिल्हा – अ‍हमदनगर.


ऐतिहासिक असा फारसा वारसा नसलेले आमचे गाव परंतु शैक्षणिक वारसा लाभलेले आमचे छोटेसे येवती गाव तालुक्यापासून ६१.४ किमी अंतरावर व जिल्ह्याच्या ठिकाणापासून ६२ किमी अंतरावर आहे . ६ वाड्यांपासून बनलेले : पहिली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा आणि आठवी ते दहावी शाळा आहेत.


स्थापना : सन १९५८ एकूण क्षेत्रफळ : १९९८०४.१० चौ. मी.सौचालय : ३८५. लोकसंख्या : एकूण स्री/ पुरुष : १७८०:८६७/९१३


गावातील वाड्या : पिम्पळचा माळा, माळवाडी, वडाची वाडी, म्हस्के वस्ती, आढाव वस्ती, दिवटे वस्ती.


tavashi

सेवा-सुविधा

पाणी

ग्रामपंचायत मार्फत पेयजल योजना सन २००८ पासून कार्यरत असुन त्याद्वारे गावामधे पिण्याच्या पाण्याची सुविधा दिली जाते. गावामध्ये ९० वैयक्तीक नळ देऊन पाणी पूर्‍विण्यात येते.

दिवाबत्ती

ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये सर्व विजेच्या खांबावर सी एफ एल दिवे बसविण्यात आले आहेत. गाव व वाड्यावस्त्या मिळून १०० सी एफ एल दिवे बसविले आहेत आणि त्याची देखभाल दुरुस्ती ग्राम पंचायत मार्फत केली जाते.

गटार लाईन

ग्रामपंचायत मार्फत विविध योजनेच्या आधारे जवळपास १ किमी अंतराची गटार लाईन बांधकाम तसेच पी व्ही सी पाईप वापरून केली आहे. त्यामधून सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा ग्राम पंचायत मार्फत दिली जाते.

स्वच्छता

ग्रामपंचायत मार्फत विविध ठिकाणी कचरा कुंडी ठेवल्या असून त्यामध्ये संकलित झालेला कचरा हा नाडेप कंपोस्ट खड्ड्यामध्ये टाकला जातो व त्यापासून खतनिर्मिती केली जाते आणि त्याचा वापर शेतकरी आपल्या शेतात खत म्हणून करतात. त्याच प्रमाणे ग्राम पंचायत मार्फत ग्राम पंचायत कार्यालय समोर पेव्हर ब्लॉक बसविले आहेत आणि सदर ठिकाणचा परिसर स्वच्छ व नीटनेटका दिसण्यासाठी मदत झाली आहे.

रस्ते / दळणवळण

ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये विविध ठिकाणी रस्ते काँक्रीटीकरण केले असून त्याद्वारे गावांतर्गत दळणवळण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राम पंचायत मार्फत विविध योजने अंतर्गत रस्ते बांधणीची कामे केली गेली आहे त्यामुळे अनुजाती व नवबौध्द घटक वस्ती,विकासनिधी, १३ वित्त आयोग या योजनेचा समावेश आहे.

वृक्षारोपण

ग्रामपंचायत मार्फत चालू वर्षी लोकसंख्या एवढी वृक्षांची लागवड वैचारिक शेतकरी / ग्रामस्तांमार्फत करण्यात आली. २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये गावाचं अस्पुर्थ सहभाग घेयून सदरची वृक्ष लागवड कोणत्याही शासकीय मदतीशिवाय केली आहे.

शैक्षणिक सुवीधा

जिल्हा परिषद मार्फत गावामध्ये २ प्राथमिक शाळा (गावठाण व आढाव वस्ती)ज्यामध्ये सेमीइंग्लिश पद्धतीच्या इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण गावातील विध्यार्थ्यांसाठी दिले जात आहे. दोन्ही शाळेमध्ये ऐकून १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे गावामध्ये दोन अंगणवाड्या असून (माळवाडी / गावठाण) त्यामध्ये ऐकून ४० विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.